उमरगा / प्रतिनिधी-

बंजारा समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी, सामाजिक परिवर्तनासाठी पक्ष भेद विसरून संघर्षासाठी तरुणांनी संघटित व्हावे.  बंजारा समाजाची शक्ती मोठी आहे, त्याचा वापर फक्त राजकिय फायद्यासाठी होतो आहे. शैक्षणिक, सामाजिक न्याय हक्कासाठी समाजाने सहनशक्ती दाखविली, आता मात्र बंजारा समाज शांत बसणार नाही, संघर्षासाठी तो रस्त्यावर उतरेल. असे मत माजी वनमंत्री संजय राठोड यांनी केले.

उमरगा, लोहारा तालुका बंजारा समाज समितीच्या वतीने सोमवारी (ता. २७) शांताई मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या बंजारा समाज स्नेह मेळाव्यात माजी मंत्री श्री. राठोड बोलत होते.

या वेळी ऑल इंडिया बंजारा संघाचे कार्याध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड, उत्तमराव चव्हाण, डॉ. सचीन जाधव, रणजीत पवार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबुराव राठोड, राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष बब्रुवान चव्हाण, सचीन राठोड (उस्मानाबाद), गुलाबदास चव्हाण, बंजारा टायगर ग्रुपच्या कविता चव्हाण, सरपंच योगेश राठोड, पुढे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बंजारा तरुणांनी बंड पुकारले, मात्र त्यांना इंग्रजानी  गुन्हेगार ठरविले. बंजारा हा मूळचा भारतीय रहिवाशी आहे, मात्र त्याला विकासापासून दूर ठेवले. आज देश व राज्य पातळीवर बंजारा संघटन वाढवून समाजाचा लढा उभा करणार आहे. कोणाला निवडून आणायचे हे बंजारा समाज ठरवू शकतो पण विविध पक्ष संघटनेत आपण विखूरले असल्यामुळे आपली शक्ती दिसत नाही. समाजाचा अनुसुचित जमातीत समावेश करावा यासह विविध मागण्यासाठी बंजारा समाज बांधवानी एकत्र यावे, असे आवाहन श्री. राठोड यांनी केले. या वेळी डॉ. टी. सी. राठोड यांनी बंजारा समाजाचा इतिहास, सद्यस्थिती आणि न्याय हक्कासाठी लढा देण्याची भूमिका विषद केली. श्री. चव्हाण, शंकर राठोड यांचीही यावेळी भाषणे झाली. रमेश जाधव, रणजीत जाधव, प्रताप राठोड, विक्रम पवार, धनराज पवार, अॅड. दिनकर जाधव, अॅड. शिवाजी चव्हाण, फुलचंद पवार, धोंडीराम पवार, संजय राठोड, सचिन राठोड, जगन चव्हाण आदींनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. के. बी. जाधव यांनी प्रास्ताविक केले, प्रा. गुलाब राठोड यांनी सूत्रसंचलन केले तर डी. एल. जाधव यांनी आभार मानले.

 
Top