उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून या अतिवृष्टीमध्ये अडकून पडलेल्या शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यामधून बाहेर काढण्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा . सुरेश  बिराजदार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांना माहिती दिली आहे. सदरील माहिती मिळताच अजित  पवार यांनी एनडीआरएफ टीमला उस्मानाबाद जिल्ह्यात जाण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर  काही वेळातच टीम जिल्ह्यात दाखल झाली आहे. परंतू हेलीकॉप्टरच्या परवानगी काढली आहे. परंतू हेलीकॅप्टर अजून आले नाही. 

उस्मानाबाद जिल्हयात अतिवृष्टीमुळे तेरणा नदी व कळंब तालुक्यातील वाकडी येथे  नदीला पूर आल्याने शेतीसह  मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक व्यक्ती या पुरामध्ये अडकलेल्या आहेत. उस्मानाबादच्या एनडीआरएफ टीम ने आपत्ती निवारण केंद्राच्या वृषाली तेलोरे यांच्या नेतृत्वाखाली १७ लोकांना पुराच्या कचाराट्यातुन सुरक्षित बाहेर काढले आहे. मंुबईवरून आलेली एनडीआरएफची टीम दुपारी उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपुर येथे दोन बाळ व दोन मोठ्या व्यक्तींना सुरक्षीतरित्या बाहेर काढण्यासाठी रवाना झाले आहेत. 

गेल्या पाच दिवसापासून काम 

उस्मानाबाद जिल्हयात गेल्या चार ते पाच दिवसापासून अतिवृष्टी झाली आहे.या अतिवृष्टीमुळे जिल्हयात कांही लोक पाण्याच्या अतिप्रवाहामुळे वाहून गेले होते. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करून देखील अखेर त्यांचे मृतदेह काढण्याचे काम करावे लागले. मुंबईवरून एनडीआरएफची टीम जिल्हयात दाखल झाली आहे. त्यापुर्वी उस्मानाबादच्या एनडीआरएफच्या टीमने लोकांना पुरातून काढण्याचे व वाचविण्याचे काम सुरू केले आहे. 

वृषाली तेलोरे-एनडीआरएफ टीम,उस्मानाबाद 

 
Top