उस्मानाबाद / प्रतिनिधी-

देशात विदेशी गुंतवणूक असणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून ई-कॉमर्स व्यापाराचा धुमाकूळ घातला आहे. त्याविरूद्ध देशभरातील व्यापारी आक्रमक झाले आहेत. गुरूवारी देशभरातील व्यापारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदने पाठवित आहेत. यानुषंगाने कॉन्फेडरेशन ऑफ आल इंडिया ट्रेडर्स संलग्नित जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 निवेदनावर कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट) जिल्हाध्यक्ष संजय मंत्री, सचिव लक्ष्मीकांत जाधव, उपाध्यक्ष संजय मोदाणी, कोषाध्यक्ष धनंजय जेवळीकर, कार्यकारिणी सदस्य विशाल थोरात, नितीन फंड यांच्यासह जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची स्वाक्षरी आहे. जागतिक पातळीवर अन्न, खाद्यपदार्थ यासह अनेक वस्तू घरपोच मागविण्याला मोठे महत्व आले असून देशातील अनेक मोठया ब्रँडच्या कंपन्यांनी या क्षेत्रात आपली गंुतवणूक वाढविली आहे. याला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद असला तरी व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे.


 
Top