उस्मानाबाद / प्रतिनिधी -

 15 सप्टेंबर हा अभियंता  सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिनी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ अस्मिता ताई कांबळे यांनी भूषविले कार्यक्रमास जि प चे बांधकाम सभापती दत्तात्रय देवळकर कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता अण्णा साळुंखे पंचायत समिती सभापती सौ हेमा ताई चांदणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार नवाळे कार्यकारी अभियंता नितीन दादा भोसले देवकर व्यंकटेश जोशी व सर्व खात्याचे खातेप्रमुख उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन जि प अध्यक्षा सौ अस्मिता ताई कांबळे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता नितीन दादा भोसले यांनी बांधकाम विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामाचा लेखाजोखा मांडला त्यामध्ये चालू आर्थिक वर्षातील योजनांचे कार्यारंभ आदेश प्रक्रिया गतीने झाल्याचे नमूद केले तसेच स्थानिक लेखापरीक्षण अंतर्गत सन 1971 पासूनच्या प्रलंबित परिच्छेदाचा निपटारा प्राधान्याने केल्याचे सांगितले कार्यकारी अभियंता डीआर देवकर व कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता अण्णा साळुंखे यांनी बांधकाम विभाग कमी क्षेत्रीय कर्मचारी बंद असताना भरीव काम करत असल्याचे व काम करणाऱ्या अभियंत्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत असे आश्वासित केले
अध्यक्षीय भाषणात जिप अध्यक्ष यांनी ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पासून शहरी भागातील विविध क्षेत्रात अभियंते कार्यरत असून मूळ बांधकाम क्षेत्रा व्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने वेळोवेळी सामाजिक बांधिलकी जपली असून काळात विभागाकडून ऑक्सिजन कॉन्टेस्ट प्रशासनास सामान्य जनतेच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिले 
सदर कार्यक्रमास उत्कृष्ट अभियंते उत्कृष्ट कंत्राटदार उत्कृष्ट पालक यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा घोळसे व आभार प्रदर्शन ओ के सय्यद

 
Top