उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील सुप्रसिद्ध देवस्थान श्री रामानंद महाराज मठामध्ये  श्रावणी सोमवार (दि. ६)व अमावस्या सणानिमित्त जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते महाभिषेक पूजा करण्यात आली. 

उस्मानाबाद तालुक्यातील काजळा येथील श्री रामानंद महाराज मठामध्ये  पवित्र श्रावण महिन्यातील अखेरचा सोमवार व  अमावस्या सणानिमित्त श्री रामानंद महाराज मठामध्ये महाभिषेक घालण्यात येतो. यावर्षीच्या महाभिषेकचा बहुमान पत्रकार श्री रणदिवे यांना मंदीर संस्थानच्या वतीने देण्यात आला. पुजारी हभप श्रीराम पाठक महाराज यांनी महाभिषेक पौराहित्य सेवा केली. यावेळी पत्रकार श्री रणदिवे यांचा श्री रामानंद महाराज देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष प्रदीप शेळके, सचिव प्रकाश देशपांडे, उपाध्यक्ष उमेश पवार, सदस्य सहदेव मडके आदींनी शाल- श्रीफळ देऊन सन्मान केला. यावेळी शिक्षक नेते विकास मगर, शरद लोमटे, वृत्तपत्र वितरक औदुंबर पाटील, अरविंद लिंगे आदी उपस्थित होते.

 
Top