नळदुर्ग  / प्रतिनिधी- 

 येथील बोरी धरणाचा सांडवा वाहण्यास सुरुवात झाला आसल्याने बोरी नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाल्याने नळदुर्गचा प्राचीन व एैतिहासीक किल्ल्यातील प्रेक्षणीय असा पाणी महाल धबधबा जोमाने सुरु झाला आहे. किल्ल्यातील नर मादी धबधबे ओसंडून वाहतानाचे विहंगम द्रृष्य पहाताना पर्यटकांच्या डोळयाचे पारणे फिटणारे आहे. दरम्यान आता पर्यटकांना हा किल्ला पहाण्यासाठी खुला करण्यात आला आसल्याने पर्यटकांना ज्या कांही सोयी सुविधा किल्ल्यात आसणे महत्वाचे आहेत त्या सर्व सोयी सुविधा किल्ला चालविण्यासाठी घेतलेले सोलापूर येथील युनिटी मल्टीकॉन कंपनी सज्ज झाली आहे. 

महाराष्ट्र शासनाने नळदुर्गचा किल्ला हा महाराष्ट्र स्मारक जतन व संगोपण योनजे अंतर्गत सोलापूर येथील युनिटी मल्टीकॉन कंपनीचे सर्वे सर्वा कपील मौलवी यांना जतन व संगोपण या आधारावर चालविण्यासाठी दिला आहे. दरम्यान या योजने अंतर्गत किल्ला पहाण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना किल्ल्यामध्ये ज्या सोयी सुविधा देणे गरजेचे आहे त्या सर्व सुविधा पर्यटकांना देण्यासाठी युनिटी मल्टीकॉन कंपनी सज्ज झाली आहे. दरम्यान गेल्या वर्षी ही किल्ल्यातील नर मादी धबधबे सुरु झाले होते पंरतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संक्रमण वाढू नये म्हणून राज्य शासनाने किल्ला पर्यटकांना पाहण्यासाठी बंद करण्यात आला होता. मात्र गेल्याच महीन्यात हा किल्ला राज्य शासनाने पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळ या वर्षी बोरी धरण भरणार की नाही, आणि पाणी महालाचे नर मादी धबधबे वाहणार की नाही अशी शंका नागरीकांना व पर्यटकांना लागली होती परंतु शनिवार दि.४ सप्टेबर रोजी झालेल्या पावसाने बोरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होवून धरण रात्रीतून पूर्णक्षमतेने भरले आहे. त्याचबरोबर धरणाचा सांडवा ही ओसंडून वाहत आहे. त्यामुळे बोरी धरणाच्या सांडव्यामुळे बोरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आणि या वाढलेल्या पाण्यामुळे एैतिहासीक व प्राचीन किल्ल्यातील प्रेक्षणीय पाणी महालावरील नर मादी धबधबे पूर्णक्षमतेने वाहण्यास सुरुवात झाले आहे. हे द्रष्य डोळयाने टिपणे म्हणजे एक अविस्मरणीय क्षण आहे. आणि याच कारणामुळे पाणी महालाचे नर मादी धबधबे सुरु झाल्यानंतर दररोज हजारो पर्यटक किल्ला पाहण्यासाठी गर्दी करीत असतात. त्यामुळे युनिटी मल्टीकॉन कंपनी पर्यटकांची होणारी गर्दी आणि या गर्दीमध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळत कोरोनाचा प्रसार होणार नाही याची दक्षता घेत पर्यटकांना नर मादी ओसंडून वाहतानाचे द्रष्य पाहण्याचा आनंद लुटण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याच बरोबर किल्ल्यातील शिल्लक धबधबा, रामडोह धबधबा, त्याच बरोबर आता नव्याने रामतीर्थ येथे बांधण्यात आलेल्या बॅरेजस चे पाणी सोडणारे दरवाजातून वाहतानाचे द्रृष्य पर्यटकांना एक पकारे मेजवानीच ठरणार आहे.

 
Top