तुळजापूर / प्रतिनिधी-

मराठवाडा मुक्ती संग्राम वर्धापन दिनाचे औचीत्य साधून ध्वजारोहणानंतर तुळजापूर तालुक्यातील ज्या कुटुंबाची प्रमुख व्यक्ती मयत झाली आहे. अशा पात्र एकुण १२ लाभार्थी यांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत प्रत्येकी रूपये २०००० / - चे धनादेश तहसिलदार सौदागर तांदळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले .

 यात  श्रीमती प्रतिभा गोवर्धन पवार तुळजापूर, श्रीमती मुक्ताबाई शिवाजी शिंदे सावरगाव, श्रीमती मंगल धनराज कोरे चिवरी , श्रीमती रेखा राजेंद्र भालेकर बसवंतवाडी,  श्रीमती आरीफा जहरूदीन जमादार जळकोट, श्रीमती ज्योती नरसिंग चव्हाण तुळजापूर, श्रीमती कलीमून महेबूब शेख नळदुर्ग, श्रीमती लक्ष्मी अनिल जानराव बोरी , श्रीमती कौसर गुलामअली मौजान नळदुर्ग , श्रीमती माधुरी गंगाधर भोसले गंधोरा,  श्रीमती शिला तायप्पा वाघमारे   तिर्थ (बु),  श्रीमती सिंधुबाई राम मिसाळ, बिजनवाडी  आदी लाभार्थ्यांचा समावेश आहे. 

या कार्यक्रमासाठी तालुक्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व नायब तहसिलदार , अव्वल कारकून , महसूल सहायक आणि तलाठी , मंडळ अधिकारी उपस्थीत होते . सदर लाभ मिळवून देण्यासाठी तहसिल कार्यालयातील संजय गांधी विभागाचे नायब तहसिलदार तसेच महसूल सहायक यांनी परिश्रम घेतले . तालुक्यातील अशा प्रकारच्या लाभापासून एखादे कुटुंब वंचित असल्यास त्यांनी सर्व कागदपत्रासह तहसिल कार्यालय तुळजापूर येथे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे .

 
Top