तुळजापूर/ प्रतिनिधी-

बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगांवकर  यांच्या शुभहस्ते माजी प्राचार्य डॉ. मोहन बाबरे  यांचे ‘ पिकवा मासे कमवा पैसे ‘ या मत्सशास्त्र विषयातील पुस्तक प्रकाशन सोहळा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संपन्न झाला. 

 पिकवा मासे, कमवा पैसे या पुस्तकाच्या प्रकाशनवेळी प्रसंगी बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर यांनी पुस्तकाचे लेखक प्राचार्य मोहन बाबर यांच्या प्रयत्नांचे कौतुक करीत हे पुस्तक नव्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे अशा शब्दात आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. माजी प्राचार्य डॉ. मोहन बाबरे यांनी यापूर्वी वेगवेगळ्या विषयांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. प्राचार्य डॉ. अनिल शित्रे यांच्या हस्ते पुष्पहार व शाल  देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य डॉ. अनिल शित्रे , गोविंद काळे , प्रा. गोवर्धन पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. रमेश नन्नवरे, डॉ. शिवाजी जेटीथोर , डॉ. प्रविण भाले , डॉ. मंदार गायकवाड याची उपस्थिती होती.

 
Top