तुळजापूर/ प्रतिनिधी-

कोरोना काळात समाजपयोगी उल्लेखनीयकार्य केल्याबद्दल समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तुळजापूर या संस्थेस अखिल भारतीय ग्राहक पंचायत उस्मानाबाद यांच्या वतीने  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री उस्मानाबाद श्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

 संस्थेने कोरोना कळत   विविध प्रकारचे समाजपयोगी उपक्रम राबविले. त्यामध्ये प्रामुख्याने राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असताना  रक्तदान शिबिर आयोजित करण्यात होते. या मध्ये 116 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते त्याच बरोबर तुळजापूर शहरातील नागरिकांना मोफत मास्क व सॅनिटायझर वाटप केले. संस्थेच्या सभासद व खातेदारांना कोरोना कालावधी घरपोच बँकिंग सेवा देण्यात आली तसेच कोरोना महामारी ने मोडकळीस आलेल्या लहान मोठ्या उद्योजक व्यवसायकाना नवीन व्यवसाय उभा करण्यासाठी सुलभ व तत्काळ कर्ज वाटप करण्यात आले. या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायत उस्मानाबाद यांनी संस्थेस सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी श्री कौस्तुभ दिवेघावकर ग्राहक पंचायत चे प्रंताध्यक्ष संपत जळके  जिल्हाध्यक्ष अनिल पाटील जिल्हा सचिव विजय बंग उपस्थित होते संस्थेच्या वतीने संस्थेचे चेअरमन नारायण नन्नवरे सचिव सज्जन जाधव ,सचिन शिंदे यांनी हा सन्मान स्वीकारला.

 
Top