उमरगा / प्रतिनिधी-

 उमरगा नगर पालिकेच्या प्रभारी नगराध्यक्ष पदी हंसराज अण्णाराव गायकवाड यांचीं सोमवारी दि 13 रोजी निवड करण्यात आली. नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांच्या बडतर्फी नंतर रिक्त झालेल्या अध्यक्ष पदावर भाजपचे हंसराज गायकवाड यांची सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास निवड करण्यात आली. मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी त्यांचे हार घालून स्वागत करीत अध्यक्ष पदभार त्याच्यावर सोपवला.

महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायत वं औद्योगिक नगरीं अधिनियम 1965 च्या कलम 54 (1) वं 55 अ वं ब अन्वये कार्यवाही बाबत नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी नगराध्यक्षा टोपगे यांना अपात्र ठरविले असल्याने रिक्त झालेल्या पदावर सदर पद भरणे बाबत मार्गदर्शक सूचना मागविल्या होत्या त्या अनुषंगाने हा पदभार देण्यात आला 

या वेळी भाजपाचें राज्य कार्यकारणी सदस्य संताजी चालुक्य, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ वं बांधकाम सभापती अभयसिंह चालुक्य,तालुका अध्यक्ष कैलास शिंदे, डॉ कपिल महाजन, माधव पवार, शहाजी पाटील, संजय कोथळीकर,राष्ट्रवादीचें नगरसेवक संजय पवार, शिवसेनेचे नगरसेवक संतोष सगर,राजश्री चव्हाण, अरुण इगवे, इराप्पा घोडके, गोविंद घोडके यांच्या सह  सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास निवडीचा मुहूर्त ठरला होता वेळेवर पदभार सोपवला जावा म्हणून राष्ट्रवादीचें गटनेते संजय पवार यांनी सकाळ पासूनच पालिकेतील सर्व कामाची आवरा आवर चालू केली होती. नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर फटाक्याची अतिशबाजी करण्यात आली.

 
Top