उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मांडवा गावातील जनतेच्या संकल्पनेतुन व संजय रामराव देशमुख यांच्या पुढाकाराने ग्रामवेस नवनिर्माणाचा शुभारंभ  दि.१० सप्टेंबर २०२१ गणेश चतुर्थी दिनी करण्यात आला. पाया खोदकाम शुभारंभ सर्वश्री प्रमोद बोधले महाराज, धोन्डूसिंह गहेरवार, प्रभू कदम व बाबू माळी आणि उत्तमनाना गरड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला. 

याप्रसंगी मोठया संख्येने सर्व जमातीचे लोक उपस्थित होते. प्रमुख उपस्थित डॉ . विजय सिंह देशमुख, माजी सरपंच विठ्ठलराव देशमुख, माजी उपसरपंच तानाजी शिंदे, युवराज पाटील, पंडितराव देशमुख, संदिपान मामा देशमुख ,जयराज परिहार, मयूर देशमुख, अनिल रणदिवे, चंद्रसेन जगताप, पांडुरंग बोराडे, ज्योतीबा कदम , समाधान माळी , विलास माळी , वराडे  व संजय देशमुख हे उपस्थित होते.

 सदर ग्रामवेशीचे नवनिर्माण लोक वर्गणीतुन होत असल्याने सर्व ग्रामस्थ , नौकरवर्ग, व्यवसायिक व गावाप्रती प्रेम असणारे मांडव्या च्या बाहेर राहणारे दानशुर व्यक्तींनी सढळ हाताने अर्थिक  मदत करावी असे अवाहन संजय रामराव देशमुख यांनी केले आहे .

देणगीदाराने   श्री . गणेश गोपाळराव देशमुख (9022701370 ) यांना संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे. 

 
Top