उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  मातंग समाजाला जर स्वतःची प्रगती करुन घ्यायची असेल तर या समाजाने शिक्षण घेतले पाहिजे कारण शिक्षणामुळे बनलेला अधिकारी वयाच्या 58 वर्षापर्यंत स्वतःची व समाजाची प्रगती करु शकतो. पण खासदार, आमदार किंवा मंत्री झालेला माणूस समाजाची प्रगती करु शकत नाही हे समाजाने लक्षात घेतले पाहिजे. जर आपली परिस्थिती बदलायची असेल तर समाजाने भरपूर शिक्षण घेतले पाहिजे. कारण हा शिक्षण घेतलेला माणूसच समाज बदलवू शकतो, समाज घडवू शकतो, समाजाचे परिवर्तन करु शकतो एवढी ताकद शिक्षणामध्ये आहे,असे प्रतिपादन रमेश बागवे यांनी केले. 

उस्मानाबाद यशराज मंगल कार्यालय सभागृहात न्यु भारतीय टायगर सेनेच्या वतीने मातंग समाज विकासापासून वंचित का ? या विषयावर मातंग समाजाचा भव्य मेळावा घेण्यात आला. या मेळावेत ते बोलत होते. 

या कार्याक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे असून प्रमुख पाहुणे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप भालेराव, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद सर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अॅड, जावेद काझी, काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष तथा विधी विभाग प्रदेश महासचिव अॅड. विश्वजीत शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्नीवेश शिंदे, काँग्रेसचे कार्यकर्ते बालाजी नायकल, अशिष मोदाणी. ल.स.क.म. जिल्हाध्यक्ष अभिमान पेठे, अमृशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनंजय ढावारे हजर होते.

 पुढे ते म्हणाले हे मातंग समाजाने समजून घेतले पाहिजे आणि मातंग समाजातील समाज बांधवांनी एकमेकाचे पाय ओढणे बंद करुन एका छत्रछायेखाली समाज परिवर्तन करण्यासाठी एकजुट झाले पाहिजे असे ते आपल्या भाषणातुन समाजाला संबोधित करत होते. ते म्हणाले प्रभाकर लोंढे यांनी न्यु भारतीय टायगर संघटनेच्या माध्यमातुन जो मेळावा घेतला त्यानी विषय ठेवला मातंग समाज विकासापासून वंचित का ? तर हा विषय विचार करायला लावणारा आहे. तर फक्त शिक्षण नसल्यामुळे हा समाज विकासापासुन वंचित आहे असे माझे म्हणणे आहे. असे त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. तर यापढे मातंग समाज बांधवांनी आपली एकजुट दाखवुन प्रत्येक पक्षाकडुन आपले कामे करुन घ्यावे आणि समाज प्रगतीकडे न्यावा असे त्यांनी सांगितले. 

या कार्यक्रमात प्रस्ताविकपर भाषण प्रभाकर लोंढे यांनी केले तर दिलीप भालेराव, अग्निवेश शिंदे, विश्वजित शिंदे यांचेही या कार्यक्रमात भाषणे झाली. या कार्यक्रमाचे आभार न्य भारतीय टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर लोंढे यांनी मांडले. या मेळाव्याला समाजाचा उत्तम प्रतिसाद मिळाला.


 
Top