तुळजापूर / प्रतिनिधी

 तुळजापूर तालुक्यातील वडगाव (देव) येथील श्री. शिवमित्र गणेश मंडळाच्या वतीने मंगळवार,दि. १४रोजी कोरोना योध्दयांचा  पुरस्कार देवुन सन्मान आला. 

  वडगाव देव येथील शिवमिञ गणेश मंडळ हे गेल्या ७ वर्षांपासून “ एक गाव एक गणपती “ ही परंपरा जोपासत आहे.    वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत राहून कोरोनाच्या काळात योगदान दिलेल्यांना  “कोरोना - योद्धा “ हा पुरस्कार तहसिलदार  सौदागर तांदळे व नायब तहसीलदार संदीप जाधव यांच्या हस्ते रुग्ण कल्याण समिती उपजिल्हा रुग्णालय तुळजापूरचे सदस्य आनंद कंदले, हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते बसवराज नरे, लोकसेवा फाउंडेशन पंकज  शहाणे, पत्रकार राम जळकोटे, पत्रकार प्रतिक भोसले, वडगाव देव येथील आशा कार्यकर्त्या शामल शिंदे, अंगणवाडी शिक्षिका बाई गिरी, अंगणवाडी शिक्षिका विजया बनचेडे, अंगणवाडी सेविका रंजना बंडगर, अंगणवाडी सेविका जनाबाई बोरगावे, वडगाव ग्रामपंचायत सेवक म्हताब शेख, जिल्हा परिषद वडगाव येथील शिक्षक घायाळ आदींना हा कोरोना - योद्धा पुरस्कार देण्यात आला.

   या  कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच पद्मिनी सगट, उपसरपंच उत्तम देवकते, तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब देवकते,  उत्तम पाटील, शिव मित्र गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रताप पाटील, उद्योजक दीपक जाधव, गावातील शेतकरी सुभाष राजमाने यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य, पदाधिकारी, गावातील नागरिक, माता -भगिनी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद राजमाने यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी सरपंच नागेश कालेकर यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत हा कार्यक्रम पार पडला.

 
Top