तुळजापूर / प्रतिनिधी

 तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे विविध मागण्यासाठी परिसरातील दहा ग्रामपंचायत सह ग्रामस्त शनिवारी दि.१८ सप्टेंबर २०२१ रोजी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. सतत मागणी करून व निवेदन देऊन सुध्दा परिसरातील रस्ता डांबरीकरण होत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन हे रस्ते होण्यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

यामध्ये जळकोट ते हंगरगा नळ, बोरगाव,सलगरा म,सिदंगाव कुन्सावळी,बोळेगाव,नांदगाव, लोहगाव,येडोळा, रामतीर्थ, या गावाला जाणारे रस्ते अत्यंत खराब झाले असून तसेच राष्ट्रीय महामार्ग लगत हंगरगा मोड,बोरमन तांडा, येथे पर्यायी रस्ता (डिवायडर) नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे तसेच जळकोट येथील रस्ता अत्यंत खराब झाला असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.या महामार्गास संपादित केलेल्या घर, दुकान, मालकांला अद्याप पर्यंत मावेजा मिळालेला नाही ते तात्काळ देण्यात यावे अशा विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

निवेदनावर जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, जळकोट चे सरपंच अशोक पाटील, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सिद्रामप्पा मुळे,  माजी जि.प.सदस्य दिलीप सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस महेश कदम, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कृष्णात मोरे,ग्रा.प.सदस्य गजेंद्र पाटील, उपसरपंच पती बसवराज कवठे,हंगरगा नळ येथील सरपंच अतुल कलशेट्टी, उपसरपंच दयानंद चौगुले, संजय वाघोले,बोरगावचे माजी सरपंच राजशेखर कलशेट्टी,शरपोदीन पटेल, सिदंगावचे माजी सरपंच बलभीम पांढरे, दत्ता बनजगोळे, नंदगावचे उपसरपंच पती दशरथ काटे,मुर्टा येथील उपसरपंच कुमार मोरे ,लोहगावचे उपसरपंच प्रशांत देशमुख, रामतीर्थचे सरपंच बालाजी राठोड,येडोळा येथील सरपंच पद्माकर पाटील, जळकोट वाडीचे ग्रा.प.सदस्य प्रकाश राठोड,प्रभाकर पाटील राजु चव्हाण, वसंत चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top