तुळजापूर / प्रतिनिधी

 तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील कुलस्वामिनी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या ‌समाजकल्यान विभागाच्या सेस मधुन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या प्रयत्नातून  मोफत सायकल चे वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळकोटचे सरपंच अशोक पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून  काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सिद्रामप्पा मुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप सोमवंशी, माजी नायब तहसीलदार माणिक चव्हाण, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख कृष्णात मोरे,ग्रा.प. सदस्य गजेंद्र कदम,उपसरपंच पती बसवराज कवठे , तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यशवंत पाटील, बबन मोरे,पिन्टू चुंगे, महादेव सावंत, आलियाबादच्या सरपंच ज्योतीका चव्हाण,ग्रा.प.सदस्य विलास राठोड, रामचंद्र पवार ,माजी सरपंच सुभाष नाईक, सिताराम राठोड, पांडुरंग चव्हाण, शंकर राठोड, शिवाजी चव्हाण, श्रीमंत राठोड,थावरू राठोड, विनायक चव्हाण,रेखु राठोड, मुख्याध्यापक सुर्यकांत चव्हाण, विनायक राठोड, नागेंद्र गुरव,सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संतोष चव्हाण यांनी केले तर आभार शरद सुर्यवंशी यांनी मानले.

 
Top