उस्मानाबाद / प्रतिनिधी-

धनगर समाजाचे नेते व भाजयुमो चे परभणीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी ३० ऑगस्ट २०२१ पासुन संपुर्ण मराठवाडयामध्ये धनगर आरक्षण आठवण दौऱ्याचे आयोजन केले आहे. मराठवाडयातील प्रत्येक जिल्हयात या दौऱ्यास सुरुवात झाली असुन दिनांक ०२ सप्टेंबर २०२१ रोजी प्रतिष्ठाण भवन धाराशिव या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चा उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तथा धनगर समाजाचे नेते इंद्रजित देवकते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा दौरा संपन्न झाला.

या दौऱ्याच्या निमित्त घेण्यात आलेल बैठकीमध्ये राजसिंहा यांनी आपल्या भाषणात सांगीतले की हे महा विकास आघाडीचे सरकार हे भुल थापा मारुन सत्तेत आलेले सरकार आहे सर्व समाजांच्या आरक्षना संदर्भात उदासिन असलेले सरकार आहे. त्यांना लोकांच्या हिताचे कोणतेही विधायक कार्य करायचे नाही फक्त सत्तेला चिकटुन रहायाचे आहे परंतू येणाऱ्या काळात या सत्तेला भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातुन धनगर समाज व अन्य सर्व सुरुंग लावल्या शिवाय राहणार नाहीत. यानंतर इंद्रजित देवकते यांनी सांगीतले की आता आमच्या समाज कुठलयाही भूल थापांना बळी पडणार नाही आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही येणाऱ्या काळात धाराशिव जिल्हयातील धनगर समाज मोठया ताकतीने सरकारच्या विरोधात मोर्चे काढेल.

 सुरेश भुमरे यांनी सांगीतले की, संपुर्ण महाराष्ट्र फिरुन धनगर समाजाला आरक्षणाची आठवण करुन देणार प्रत्येक नेत्याने आजपर्यंत आमच्या समाजाला केवळ फसवण्याचे कार्य केलेले आहे परंतू आता असे होवुन देणार नाही. समाजाच्या आरक्षणासाठी मराठवाडयातील धनगर समाज बांधवांन एकत्रीत करुन या तीन टांगी सरकारच्या विरोधात तिव्र आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे सांगीतले.

 या बैठकीचे सुत्रसंचलन आत्मनिर्भर भारत जिल्हा संयोजक सचिन लोंढे यांनी केले तर आभार युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस ॲड.कुलदिपसिंह भोसले यांनी केले. यावेळी प्रा. सोमनाथ लांडगे, डॉ.संतोष पाटील, अशोक गाडेकर, निखील हुंडेकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे सुरज शेरकर, गणेश एडके, प्रसाद मुंडे, आकाश लोहट, विजयराव साखरे, मुंजाभाऊ भुमरे, रामराव देबंरे, पाराजी भुमरे, विनायक कातकडे, विष्णु पारधे, मुंजाभाऊ ओव्हाळ, सोनु बंखाल इत्यादी उपस्थीत होते.  

 
Top