तेर / प्रतिनिधी : - 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील बसस्थानकामध्ये बीओटी तत्त्वावर शॉपिंग सेंटर बांधण्याची मागणी तेर येथील राहुल गायकवाड यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे बस स्थानकाची 71 गुंठे जागा असून बसस्थानकाच्या जागेत बीओटी तत्त्वावर शॉपिंग सेंटर बांधण्यात यावे.  शॉपिंग सेंटर बांधल्यानंतर तेर व  परिसरातील सुशिक्षित बेकारांना व्यवसाय करण्यासाठी सोयीचे होणार आहे. तरी तेर येथील बसस्थानकामध्ये बीओटी तत्त्वावर शॉपिंग सेंटर बांधण्याची मागणी तेर येथील राहुल गायकवाड यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


 
Top