परंडा / प्रतिनिधी : - 

परंडा तालुक्यातील अनाळा येथील अंगणवाडी क्र - मध्ये आरोग्य पोषण सप्ताह कार्यक्रम दि.४ रोजी घेण्यात आला.या कार्यक्रमात महिलाना आरोग्य पोषण विषयी  अनाळा बीटच्या सुपरवायझर श्रीमती लोंढे यांनी मार्गदर्शन केले . 

गरोदर माता , स्तनदा माता , किशोर वयीन मुली यांनी पोषण आहार कसा घ्यावा , गरोदरमातांनी गरोदरपणात आहारात पालेभाज्या , विविध प्रकारची फळे घ्यावीत  याविषयी माहिती दिली .

 कार्यक्रमास ग्रामसेवक ओ एम. बिराजदार, अंगणवाडी सेविका व्हि. ए. मोरे , एच. एस. शेख , मदतनिस बी. ए. बावकर , ग्रा. प . लिपिक भिवा चव्हाण , पत्रकार साजीद शेख ग्रा. प . सदस्य अशोक शिंदे यांच्यासह महिला , किशोरवयीन मुली उपस्थित होत्या.


 
Top