तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यात शनिवार दि.५ रोजी राञी  वादळीवा-या सह झालेल्या मुसळधार  पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले.  सुमारे दहा ते पंधरा हेक्टर क्षेत्रातील ऊससह अन्य खरीप पिके आब्याचा बागांचे मोठे नुकसान झाले. इटकळ सर्कल मध्ये 77 मिमि पाऊस होवुन अतिवृष्टी झाली तसेच नळदुर्ग स्थित बोरी धरण फुल्ल भरून वाहत होते. 

 सलगरादिवटी येथे  जुनी दगडी घरे घरांची पडझड झाली.  दोन विभागात  जोरदार पाऊस होवुन  शेतकरी जयकुमार  जाधव व सचिन जाधव, भाऊसाहेब  जाधव, उल्हास जाधव यांची जमिन व बांध ऊस पिके वाहुन गेली .तसेच तडवळा येथील शेतकऱ्यांचा उभा ऊस आडवा होवुन मोठे नुकसान झाले.  सदरील ठिकाणी तहसिलदार सौदागर तांदळे यांनी भेट देवुन पाहणी करुन नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत. 
Top