उस्मानाबाद /प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे आरक्षण पूर्ववत केल्याशिवाय महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेवू नयेत,ओबीसी ची जात निहाय जनगणना केंद्र व राज्य सरकारने त्वरित करावी. ईम्परिकल डेटा मा. सर्वोच्च न्यायालयास त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा यासोबतच अन्य विविध मांगण्यासाठी ओबीसी व्हिजेएनटी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्रच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत  निवेदन पाठविण्यात आले आहे. 

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, राज्य मागासवर्गीय आयोगास त्वरित निधी उपलब्ध करून देण्यात यावा, महाज्योतीसाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्यात यावा., राज्य मागासवर्गीय आयोगास ईम्परिकल डेटा तात्काळ संकलन करण्याचे आदेश द्यावेत आदी विविध मागण्या ओबीसी व्हिजेएनटी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आल्या निवेदन देती वेळी राज्य समन्वयक तथा जिल्हाध्यक्ष शिवानंद कथले, जिल्हाउपाध्यक्ष रंगनाथ दुधाळ, वैजिनाथ गुळवे, मार्गदर्शक सय्यद खलिल सर लक्ष्मण माने ,आबासाहेब खोत, सतीश कदम ,मौलाना आलिम ,सुरेश गवळी, सतीश लोंढे, कस्तुराबाई तुप्पे , सुनील पंगुडवाले भाऊ भांगे आदी  च्या स्वाक्षरी आहेत.


 
Top