तुळजापूर / प्रतिनिधी- 

 तुळजापूरा शहरातील विविध भागात डास निमुर्लनासाठी  पँराथाँल औषध फाँगिग मशीन द्वारे फवारणी  करण्यात येत असुन दोन मशीन माध्यमातून ही फवारणी  विविध वार्डात केली जात आहे.

पाऊस आगमन पार्श्वभूमीवर शहरात  सर्वञ डासाचा प्रमाण वाढले असुन या  डासांच्या  उच्छादाला नागरिक  चांगलेच वैतागून गेले होते. या डासांच्या निमुर्लनासाठी औषध फवारणी करण्याची मागणी शहरवासियांनमधुन केली जात होती. या पार्श्वभूमीवर 31आँगस्ट पासुन शहरातील विविध भागात डास निर्मुर्लन करणारे औषध फवारणी उपक्रम सुरुवात करण्यात आली. राञी डास अधिक चावत असल्याचा पार्श्वभूमीवर सध्या दोन मशीनद्वारे पँराथाँल औषध फवारणी  केली जात आहे.शहरभर फवारणीसाठी पंधरा दिवस लागण्याची शक्यता असुन शहर स्वछता नििरक्षक दत्ता सांळुके यांच्या मार्गदर्शनखाली नगरपरिषदच्या कर्मचाऱ्यांनी आजपर्यत मंदीर महाद्वार परिसर, भवानी रोड, महाद्वार रोड, मंगळवार पेठ, गुरव गल्लीसह अनेक भागात फवारणी करण्यात आली. असुन उर्वरित भागात फवारणी सुरु आहे. 


 
Top