तुळजापूर / प्रतिनिधी- 

 तिर्थक्षेञ तुळजापूर नगरपरिषद मधील तीन महत्वपुर्ण अधिकाऱ्यांच्या पंधरा  दिवसात इतरञ बदल्या झाल्याने व या जागांवर शासनाकडून प्रतिनियुक्त्या करण्यात न आल्याने त्यांचा परिणाम नगर परिषद कामकाजावर होण्याची शक्यता आहे.

तुळजापूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी अशिष लोकरे यांचा कार्यकाल पुर्ण झाल्याने त्यांची सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह प्रशासनअधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर रचना सहाय्यक संदीप जाधव यांची उमरगा नगरपरिषद मध्ये नुकतीच बदली झाली तर संगणक अभियंता अभ्यंग गायकवाड यांची निलंगा नगर परिषद येथे बदली झाली आहे. ही मंडळी तिथे रुजू झाले आहेत. 

या तीन महत्त्वपुर्ण अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने याचा परिणाम नगरपरिषद कारभार व  आगामी नगरपरिषद निवडणुक,शारदीय नवराञोत्सव पुर्वतयारीवर होणार आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने बदली अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जागेवर त्वरीत प्रतिनियुक्त अधिकार, कर्मचारी देण्याची मागणी होत आहे.


 
Top