उस्मानाबाद/प्रतिनिधी : 

वाढत्या तंत्रज्ञानाचा प्रभाव शिक्षण क्षेत्रावर पडल्याने आँफलाईनला शिक्षणाला आँनलाईन पर्याय ठरलाय. परंतु शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यात पहिल्या सारखा जिव्हाळा राहिला नाही. पूर्वी आम्ही विद्यार्थी असताना आणि आता शिक्षक म्हणून काम करताना बदललेला काळ सहज लक्षात येतो. आता शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातला ओलावा कमी झालाय अशी खंत शिक्षक शंकर साठे यांनी व्यक्त केली.

 जिल्हा परिषद शाळा तांडा येथे आयोजित आपल्या  सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी संजीव बागल, अध्यक्षा म्हणून विस्तार अधिकारी  रोहिणी कुंभार यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर उपस्थित होते. 

पुढे बोलताना साठे यांनी त्यांच्या पस्तीस वर्षाच्या सेवेतल्या सुखद आणि कटु अआठवणी सांगितल्या. बदलीमुळे  कुटुंबापासून दूर राहाताना होणारी भावनिक वाताहत सांगताना त्यांचे डोळे पाणावले. येवती सारख्या एक खेड्यातून सुरू झालेला प्रवास जिद्द, चिकाटी आणि मेहनतीमुळे इथपर्यंत घेऊन आला. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यातली वीण आणखी घट्ट करण्यासाठी संवाद कौशल्य वाढवायला हवं. विद्यार्थ्यांना समजून घ्यायला हवं. सोबतचं आधुनिक शिक्षण पध्दती स्विकारली पाहिजे.असेही विचार त्यांनी मांडले. दरम्यान शंकर साठे यांच्या सेवानिवृत्ती बद्दल मित्र परिवारानेही शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. 

यावेळी आर्य चाणक्य शाळेचे संजय साठे, सांजा ग्रामपंचायतचे लिपीक तुकाराम चांदणे, अँड.राजू कसबे, लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अभिमान पेठे, ह.भ.प.दत्ता कसबे, माणिक साठे, बालाजी झोंबाडे, संजय माने, सतिश लोंढे उपस्थित होते.

 
Top