उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासह जिल्हा पर्यटनक्षम बनवण्यासाठी जिल्हा पर्यटन विकास समितीच्या वतीने सोमवारी (दि.२७) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जवळील हातलाई तलावात उभारण्यात येत असलेल्या पर्यटन विषयक कामांना गती द्यावी. जिल्ह्यात पर्यटन वाढावे व पर्यटनास उपयुक्त वातावरण निर्मिती झाल्यास जिल्ह्याच्या विकासात योगदान मिळू शकते. पर्यटनास उपयुक्त जिल्हा म्हणून उस्मानाबादची ओळख निर्माण होण्यासाठी पर्यटन विकास समिती अनेक वर्षांपासून काम करत आहे. हातलाई तलावाजवळ ८० लाख रुपये खर्चातून संगीत कारंजे व इतर कामे प्रशासनाने हाती घेतली असून ती पूर्णत्वास येत आहे. ही कामे लवकर पूर्ण होवून जिल्ह्यातील पर्यटनाला त्याचा लाभ व्हावा. निवेदनावर जिल्हा पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे, सचिव देविदास पाठक, अब्दुल लतिफ, गणेश वाघमारे, बाबा गुळीग, शंकर खुने व सदस्यांच्या स्वाक्षरी आहेत.


 
Top