उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. तर पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमधून प्रचंड प्रमाणात धूर निघून वातावरण दूषित होऊ लागल्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होऊ लागला आहे. दूषित पर्यावरणामुळे मानवी अर्थात सजीव सृष्टीच्या अस्तित्वालाच प्रचंड धोका निर्माण झाला आहे. तो टाळण्यासाठी  नैसर्गिक गॅस अर्थात सीएनजी गॅस पंपाचा पर्यायी मार्ग निवडण्यात आला आहे. तो सीएनजी गॅस पंप उस्मानाबाद शहरात सुरु झाला असल्यामुळे गॅसवर चालणाऱ्या वाहनधारकांना सोय उपलब्ध होण्याबरोबरच त्यांना दिलासा देखील मिळू लागला आहे.

 उस्मानाबाद शहरातील सांजा रस्त्यालगत असलेल्या रवि शेरखाने यांनी राजलक्ष्मी सीएनजी गॅस पंप ग्राहकांच्या सेवेसाठी दि. १५ ऑगस्टपासून अत्याधुनिक यंत्रणेसह सुरु केला आहे. त्यामुळे दररोज डिझेल व पेट्रोलच्या वाढत्या दराला कंटाळलेल्या वाहनधारकांना या पंपामुळे मोठा दिलासा मिळू लागला आहे. तर ग्राहकांना आधुनिक व अत्यावश्यक सेवा देत असलेल्या गॅस पंपावर वाहन चालक गॅस भरण्यासाठी सोलापूरसह इतर विविध भागातून येत असल्यामुळे गर्दी होऊ लागली आहे.

पर्यावरणामध्ये प्रदूषणाची मात्रा मोठ्या प्रमाणात वाढत चालल्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपले राष्ट्रीय व आद्य कर्तव्य समजून वाढणारे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी जर आपण पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करीत असाल तर त्यात आणखीनच भर पडत आहे. त्याऐवजी सीएनजी कार व इतर वाहनांचा वापर करण्यावर भर देणे आवश्यक व काळाची गरज निर्माण झाली आहे.

 
Top