उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 डॉ. पद्मसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक च्ॉरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र व तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन रविवार दि. 11/09/2021 रोजी, मौजे. दाऊतपूर    ता. जि. उस्मानाबाद    येथे सकाळी 10:00 ते 5:00 या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीराचा व परिसरातील सर्व वयोगटातील 550 महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ज्हदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग यासह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधांचा पुरवठा करण्यात आला.  

या शिबीराचे उदघाटन जि. प. अध्यक्षा सौ. अस्मिता कांबळे  यांच्या हस्ते झाले. यावेळी    भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. नितीन काळे, जि. प. सदस्या येरकर म्ॉडम, सरपंच बंकट शिंदे, संपत दादा, सिद्राम महाडिक, पोपट गडदे, दशरथ नरटे, राजाभाऊ शिंदे, शिवाजी नरटे, कार्तीक थोरात, यांच्यासह  नागरीक उपस्थिती होते. 

 शिबीरात मुंबईचे डॉक्टर्स डॉ. अजीत निळे डॉ. मोहंमद तजीब, डॉ.  शंतनु काळंबे , डॉ. महेश पार्थ डॉ. अनसुकुमार डॉ. आदित्य बोरकर सौ. परवीन सय्यद यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. यावेळी तेरणा जनसेवा केंदाचे श्री. सुजीत पाटील, विनोद ओव्हळ, रवि शिंदे , पवन वाघमारे, सचिन चव्हाण, रुपाली शिंदे, रेखा गडदे यांनी  परिश्रम घेतले.

 
Top