उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील शशिकला देशमुख (८९) यांचे वृद्धापकाळाने खासगी रुग्णालयात शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कपिलधार स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यविधी करण्यात आले. त्यांच्या पश्चात सुना, नातवंडे, पतरुंडे असा परिवार आहे. त्या मराठवाड्यातील विविध शिक्षण संस्थांची उभारणी करणारे थोर स्वातंत्र्यसेनानी, माजी खासदार अॅड. नरसिंगराव देशमुख यांच्या पत्नी होत. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात सहभाग घेतला होता. अॅड. अविनाश देशमुख यांच्या त्या मातोश्री होत.


 
Top