उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , उस्मानाबाद आणि डॉ . बापूजी साळुखे विधी महाविद्यालय उस्मानाबाद यांच्या संयुक्त विधमानाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या परिषद दालनात ( कॉन्फरेन्स हॉल मध्ये )आयोजित केला . 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री . वसंत यादव सचिव , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली . श्रीमती . एच आर . खान अती . दिवाणी न्यायाधीश , क . स्तर , उस्मानाबाद व श्री . एम . बी . माढेकर- विधिज्ञ , विधिज्ञ मंडळ , उस्मानाबाद यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे विवेचन केले , तसेच डॉ . संजय आंबेकर- प्रा . डॉ . बापूजी साळुखे विधी महाविद्यालय उस्मानाबाद यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिवस का साजरा केला जातो ? त्याचे महत्व सामाजिक , राजकीय , आर्थिक , शैक्षणिक , कायद्याच्या संदर्भात कसे आहे याचा उहापोह विविध संदर्भ देऊन आजचा युवक कसा हवा हे विधी विद्यार्थी आणि विधिज्ञ यांना पटवून दिले . कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत श्री . नितीन भोसले अध्यक्ष , जिल्हा विधिज्ञ मंडळ , उस्मानाबाद है होते तसेच पुजा शिंदे , वैष्णवी दंडनाईक , मीनाक्षी राठोड , रुपाली जाधव , कल्पना खोत , शुभम तांबे , सुमित खोसे , शिवराज माने , महेश लिमये , इत्यादी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थीही उपस्थित होते . 

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री . अनिल द घुले- अधीक्षक , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांनी केले व आभार प्रदर्शन कु . द्वारका देवळे- विद्यार्थिनी डॉ . बापूजी साळुखे विधी महाविद्यालय हिने केले .

 
Top