तेर  / प्रतिनिधी -

दिशा समिती अध्यक्ष तथा खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या सूचनेप्रमाणे  कौस्तुभ दिवेगावकर जिल्हाधिकारी उस्मानाबाद,.डॉ चारुशीला देशमुख जिल्हा पुरवठा अधिकारी, . गणेश माळी तहसीलदार उस्मानाबाद यांच्या आदेशानुसार २० ऑगस्टला तेर येथील श्री. संत गोरोबा काका भक्त निवास येथे “”माझी शिधापत्रिका माझा हक्क”” शिबीर पार पडले.

 या शिबिरामध्ये शिधापत्रिकेत नाव समावेश करणे 212, नाव कमी करणे  4 , जीर्ण शिधापत्रिका बदलून नवीन शिधापत्रिका देणे 334 , महात्मा फुले जण आरोग्य योजना प्रमाणपत्र देणे 1 इतक्या लाभार्थ्यांनी सहभाग घेतला.शिबिरासाठी  राजाराम केलूरकर तालुका पुरवठा अधिकारी,  अनिल तीर्थंकर मंडळ अधिकारी तेर, श्रीधर माळी तलाठी तेर, श्रीनिवास पवार तलाठी वाघोली, राहुल बेशकराव तलाठी हिंगळजवाडी, रेश्मा पाटील तलाठी काजळा,  हराळकर तलाठी कोळेवाडी,  रविराज चौगुले उपसरपंच तेर, फातिमा मणियार पोलीस पाटील,माजी उपसरपंच मज्जित मणियार, तेर मंडळातील  रास्त भाव दुकानदार आदी उपस्थित होते.


 
Top