परंडा / प्रतिनिधी -

 मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख पदाचा अतिरिक्त प्रभारी पदभार सेवा ज्येष्ठतेनुसार द्यावा व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्यामुळे सेवा पुस्तिका ऑनलाईन कराव्यात या अनुषंगाने परंडा गट शिक्षणाधिकारी अनिता जगदाळे मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केले आहे की, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख पदाचा पदभार हा सेवा ज्येष्ठतेनुसार देण्यात येऊन सदरिल पदाची गरिमा राखली जावी यासाठी संघटना वारंवार ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देत आहे.परंतु जाणीवपूर्वक या विषयाला बगल देऊन न्याय मागणीकडे दुर्लक्ष केले जातआहे. ही बाब न्याय उचित नाही. शासन निर्देशांची पायमल्ली करून सेवा कनिष्ठ,आपल्या मर्जीतील, संबंधातील, जवळच्या शिक्षकांकडे मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख पदांचे पदभार दिले आहेत.हा सरळ सरळ सेवा ज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय आहे.त्यामुळे प्रशासकिय कामकाजात अडथळे निर्माण झाले आहेत.तसेच शिक्षकांच्या सेवा पुस्तिका ऑनलाईन करण्याचं काम अपूर्ण आहे त्यात आपण लक्ष घालून पूर्ण करावे.यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.लवकरच योग्य तो निर्णय घेऊन न्याय देऊ असा शब्द संघटनेला दिला आहे.

 यावेळी कार्यालयीन विस्तार अधिकारी सतिश संगमनेरकर, प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, जिल्हा नेते संतूक कडमपल्ले, परंडा तालुका उपाध्यक्ष शहाजी झगडे आदि उपस्थित होते.


 
Top