उमरगा / प्रतिनिधी : -

शहरातील जेष्ठ महिला श्रीमती काशीबाई प्रभू सूर्यवंशी (१०० वर्ष) यांचे सोमवारी (दि ३०) सकाळी राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. श्रीमती काशीबाई सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी शहरातील कोरेगावरोड लगत असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर व नागरिक उपस्थित होते. दैनिक भास्करचे तालुका संवाददाता माधव सूर्यवंशी यांच्या मातोश्री होत.


 
Top