परंडा / प्रतिनिधी : -

तालुक्यातील चिंचपुर बुद्रुक येथे हनुमान मंदिर  व विठ्ठल रुक्माई मंदिर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शेळगाव गट च्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात धार्मिक स्थळे उघडण्यासाठी व या मोगलाई सरकारला जाग आणण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आले.

 या आंदोलनात चिंचपूर बु. भाजपा पंचायत समिती सदस्य सौ.अश्विनी सतीश देवकर यांचे प्रतिनिधी सतीश कैलास देवकर,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनिल पाटील, परंडा भाजपा सोशल मिडिया सेल अध्यक्ष आकाश देवकर, उपस्थित होते. तसेच चिंचपुर बुद्रुक चे सरपंच शिंदे, उपसरपंच सावंत, देवगाव बुद्रुक भाजपाचे चे सरपंच  ठाकरे, उपसरपंच सुग्रीव कदम, ग्रामपंचायत सदस्य दादा आरे, ईश्वर शिंदे,चिंचपुर बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य महेश देवकर, भागवत शिंदे, शितल सुतार, विद्या सावंत, तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.


 
Top