उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कडदोरा (ता. उमरगा) येथील राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उमेश खोसे यांची पुरस्कारसाठी निवड झाल्याबद्दल  नायगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते सत्कार  करण्यात आला.

उमेश खोसे यांची राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नुकतीच निवड झाली आहे.  यानिमित्त मुक्ताई महिला बिगरशेती पतसंस्था नायगाव यांच्या व विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांच्यावतीने संजय पाटील दुधगावकर यांनी त्याचा  सत्कार केला. 

 याप्रसंगी तेरणा माजी संचालक भरत पाटील, बाळासाहेब शितोळे, उपसरपंच अशोक माळी,विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सुधाकर शितोळे, मुक्ताई पतसंस्थेचे संचालक महादेव मेनकुदळे, विकास सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास राऊत, आप्पासाहेब गोरे, गणेश गोरे,भरत गरड, विशाल पाटील, नवनाथ गोरे,दामोदर माळी, गोरोबा शितोळे, विठ्ठल काळे, उद्धव शितोळे, चंद्रसेन माळी यांच्या गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन कल्याण पांचाळ यांनी तर आभार आप्पासाहेब गोरे  यांनी मानले.

 
Top