भागवत कराड यांच्या हस्ते उद्या पुरस्कार वितरण


उस्मानाबाद / प्रतिनिधी

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा जीवनसाधना पुरस्कार प्राचार्य डॉ.रमेश विठ्ठल यांना घोषित करण्यात आला आहे.

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६३ वा वर्धापन दिन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.ना.डॉ.भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि.२३) विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात येणार आहे.

    विद्यापीठाच्या नाटयगृहात सोमवारी (दि.२३) सकाळी १०:३० वाजता मुख्य समारंभ हाईल. यंदाच्या वर्धापनदिनाचे प्रमुख पाहुणे औरंगाबादचे भुमीपूत्र मा.ना.डॉ.भागवत कराड (केंद्रीय अर्थराज्यमंत्री) हे असणार आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळात महत्वपूर्ण पदावर डॉ.कराड यांची नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच विद्यापीठात येत आहेत. विद्यापीठाच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त दि.२३ ऑगस्ट सकाळी १० वाजता प्रशासकिय इमारती समोरील हिरवळीवर येथे मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन मा.डॉ.भागवत कराड ( केंद्रिय अर्थ राज्यमंत्री भारत सरकार) हे उपस्थित राहणार आहे. मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात ‘जीवनसाधना पुरस्कार‘ प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या विविध परीक्षेमध्ये गुणवंत विद्याथ्र्यांचा व विविध परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा सत्कार तसेच आदर्श परीक्षा केंद्र पुरस्काराचे वितरण करण्यात येईल. ‘फिजीकल डिस्टिन्सिंग‘ ठेऊन सदर कार्यक्रम होईल.

यावर्षीच्या पुरस्कार येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश दापके यांना प्रदान करण्यात येणार आहे.  विद्यापीठाच्या ६३ व्या वर्धापन दिन समारंभात पुरस्कार वितरण समारंभात आला. 

डॉ. दापके यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान

    प्राचार्य डॉ रमेश दापके यांना शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘जीवन साधना‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या पाच दशकांपासून ते या क्षेत्रात सक्रीयपणे कार्यरत आहेत. त्यांनी  प्राध्यापक, प्राचार्य, परीक्षा मंडळ, संवैधानिक मंडळावर सदस्य म्हणून कार्य केले. उस्मानाबाद उपपरिसराचे संचालक व उपपरिसर मंडळ संचालक म्हणूनही त्यांनी मोठे योगदान दिले.  शहरातील साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीतील योगदानाबद्दल सदर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. प्राचार्य रमेश दापके यांना जीवन साधना पुरस्कार घोषित झाल्याबद्दल प्रस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर व प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख, संचालक डी.के. गायकवाड, उपकुलसचिव डॉ. दिगंबर नेटके यांनी अभिनंदन केले आहे.

 कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी व डॉ.मुस्तजिब खान यांनी केले आहे.

 
Top