तुळजापूर /  प्रतिनिधी- 

तिर्थक्षेञ तुळजापूर येथील प्राचीन असणारे  मंकावती तिर्थकुंड हडपल्या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले होते. या  आदेशाला नगर विकास मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे .

या बाबतीत नगरपरिषद ने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली होती, माञ या स्थगितीमुळे ही प्रक्रिया आता थांबली आहे. तुळजापूर येथील  देवानंद  साहेबराव रोचकरी यांनी  या प्रकरणात मंत्र्यांकडे अपील मूळ मालक शेटीबा मंकावतीराव रोचकरी  यांच्या मालकीची व वडिलोपार्जित असल्याचा लेखी दावा  मंत्र्यांकडे केला आहे तसेच त्यावरून ही स्थगिती देण्यात आली. या प्राचीन कुंडाची नोंद त्यांच्या नावावर आहे .

सदरील मंकावतीकुंड कडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमणे आहेत याकडे गेली अनेक वर्षापासून प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे तुळजापूर विकास प्राधिकरणची वाट लागली आहे. तरी प्रशासनाने तुळजापूर विकास प्राधिकरण विकास कामे व मंकावती कुंड प्रकरणाचा छडा लावावा शहरात सर्वञ प्रचंड अतिक्रमणे आहेत ते स्वता जिल्हाधिकारी यांनी काढण्याची मागणी भाविकांनसह शहरवासियांनमधुन केली जात आहे.  

 
Top