लोहारा/प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील सास्तूर गावामध्ये सध्या डेंगु सदृश्य व चिकन गुणिया सदृश्य तसेच तापीचे रुग्ण वाढले असल्याने वै.आ.प्राथमिक आरोग्य केंद्र माकणी यांच्या सूचनेनुसार व जि.प.सदस्या सौ.शीतलताई राहुल पाटील, उस्मानाबाद भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा पाटील व स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ.रमाकांत जोशी यांच्या उपस्थितीत सास्तुर ग्रामपंचायातच्या वतीने धूर फवारणी यंत्राच्या साह्याने डेल्टामेथ्रीन औषध टाकून संपूर्ण गावामध्य  करण्यात आली.

 तसेच आशा ताईच्या मदतीने, प्रा.आ.केंद्र माकणीच्या वतीने संपूर्ण गावामधील प्रत्तेक घरामध्ये अॅबंटीग करण्यात आले. व प्लिवर सर्वे करून उपाय योजना करण्यात येत आहे. धूर फवारणी करण्यासाठी सास्तुर ग्रामपंचायात चे सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायात कर्मचारी, आदींनी परिश्रम घेतले.

 
Top