तुळजापूर / प्रतिनिधी-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे बंद करण्याचा राज्य शासनाचा आदेशाला हरताळ फासत खुलेआम सुरू असणारी तीर्थक्षेत्र तुळजापुरातील ३ मंदिरे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी सील केली आहेत. दरम्यान, दैनंदिन धार्मिक पूजा विधीची परवानगी देण्यात आल्याचे तहसीलदार तांदळे यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारने राज्यातील धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, तुळजाभवानी मंदिरालगतच्या उपदेवतांच्या मंदिरात भाविकांना दर्शनासाठी गर्दी होत असल्याचे आढळून आले. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना उपदेवतांच्या मंदिरात दर्शनासाठी मोठया प्रमाणात भाविक येत आहेत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

 
Top