काटी/  प्रतिनिधी

 तुळजापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या वतीने सध्या सर्व गावात कोरोना पाठोपाठ आता डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू या साथरोगाचा फैलाव होत आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत गावात डेंग्यू साथरोगाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करुन डासावरील औषध फवारणी सुरु करावी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपसभापती दत्तात्रय शिंदे यांनी सुचना दिली आहे.

 डेंग्यू हा साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी यासाठी तुळजापूर तालुका पंचायत समितीचे नुतन उपसभापती दत्तात्रय शिंदे यांनी गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांचेकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने उपसभापती शिंदे यांनी केलेल्या सुचनांची अंमलबजावणी करुन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांनी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना डेंग्यू साथरोगाबाबत आपआपल्या कार्यक्षेत्रात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत जनजागृती करुन फवारणी करावी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे सुचना दिली आहे.

 
Top