परंडा / प्रतिनिधी : - 

साहित्यातून समाज परिवर्तन करणारे साहित्यिक साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे होते असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयांमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये व्याख्याते म्हणून धनंजय सोनटक्के यांनी केले.

 शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय आणि संत गाडगेबाबा महाविद्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून प्राचार्या डॉ. दीपा सावळे या उपस्थित होत्या तर प्रमुख व्याख्याते म्हणून धनंजय सोनटक्के हे उपस्थित होते.व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे, माझी नॅक समन्वयक प्रा.डॉ. विद्याधर नलवडे,आई क्यू ए सी चे माजी  समन्वयक प्रा.दीपक तोडकरी हे उपस्थित होते.  यावेळी अण्णाभाऊ साठे आणि बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन व सूत्रसंचालन डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले.  यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.जेथवणी रणधीर मिसाळ या विद्यार्थिनीने अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले.

     पुढे बोलताना धनंजय सोनटक्के  म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष केला आणि त्या संघर्षातून समाज परिवर्तन केले.परंतु आजही देशामध्ये व राज्यांमध्ये जाती जातीचे राजकारण केले जाते.अण्णाभाऊंचे संपूर्ण जीवन हे केवळ लोककल्याणासाठी लाभले आहे त्यांनी आपल्या साहित्यातून आपल्या शाहिरीतून प्रत्येक माणसाच्या मनामध्ये घर केले.प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी परदेशात जाऊन आपल्या साहित्याचा ठसा उमटविला.   अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ.दीपा सावळे म्हणाल्या की संपूर्ण समाजाच्या दुःखाचा विचार करणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे होते. वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे त्यांच्यावर साहित्य लिहिणारे साहित्यरत्न होते.अण्णाभाऊ साठे यांनी देशातील पराक्रमी माणसे, प्रेम कथा, ग्रामीण जीवन अशा अनेक विषयावरती आपले साहित्य निर्माण केले.त्यांनी जीवनामध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत . 

 यावेळी कोरोणाचा प्रादूर्भाव असल्यामुळे विद्यार्थी उपस्थित नसल्याकारणाने विद्यार्थ्यांपर्यंत अण्णाभाऊंचे विचार जावे त्यासाठी झूम ॲप द्वारे महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांना लिंक पाठवण्यात आली व सर्व विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांनी या व्याख्यानाचा आनंद घेतला.पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. सचिन चव्हाण यांनी दिला . 

या कार्यक्रमासाठी मराठी विभाग प्रमुख डॉ.हरिश्चंद्र आई क्यू ए सी चे चेअरमन डॉ.महेशकुमार माने, हिंदी विभागाचे प्रा.डॉ.बाळासाहेब राऊत, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.प्रशांत गायकवाड, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.कृष्णा परभणे, ग्रंथपाल डॉ.राहुल देशमुख, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विशाल जाधव, वाणिज्य विभागाचे डॉ.संभाजी गाते,अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अरुण खर्डे, रसायनशास्त्र विभागाचे प्रा.जगन्नाथ माळी, वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रकाश सरवदे, तसेच महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी कोव्हीड- १९ चे पालन करत उपस्थित होते.शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.विद्याधर नरवडे यांनी मानले .


 
Top