कळंब / प्रतिनिधी-

 शहरातील संत ज्ञानेश्वर निराधार बालक आश्रम,तांदुळवाडी रोड येथे स्पॅक्टीकल कोब्रा या जातीचा विषारी साप दि २४ ऑगस्ट रोजी सर्पमित्र अमर लाटे यांनी कळंब तांदळवाडी रोड वरील संत ज्ञानेश्वर बालकाश्रम परिसरातून आपल्या कुशलतेने पकडून भरणीत बंद केला. 

आश्रम परिसराला लागून सह्याद्री हॉस्पिटल आहे.या हॉस्पिटल चे फार्मासिस्ट निलेश घोडके व हर्षवर्धन पाटील यांनी या परिसरात साप असल्याचे सर्पमित्र अमर लाटे यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क केला. यावेळी अमर लाटे,बबलू शेख व प्रथम हौसलमल यांनी तात्काळ येऊन आपल्या कौशल्याने हा साप पकडला व भरणी बंद केला.संत ज्ञानेश्वर बालकाश्रमचे संचालक ह.भ.प. महादेव महाराज आडसुळ यांनी लाटे यांच्या या कामगिरीचे कौतुक केले. सर्पमित्र अमर लाटे यांनी आज पर्यंत २५० सापाला पकडून येडशी येथील अभयारण्यात सोडून जीवदान दिले आहे. भारतीय संस्कृतीत सापाला महत्त्व आहे.त्याची पूजा होते तो शेतकऱ्याचा मित्र आहे असे सांगितले जाते. विशेष श्रावण महिन्यात नागपंचमी या सणाच्या दिवशी नागोबाची महिला पूजा करतात. आपल्या भागात आढळणाऱ्या सापांच्या जातींपैकी स्पॅक्टीकल कोब्रा,घोणस, फुरसे,मन्यार या विषारी तर धामण, कवड्या,कुकरी या बिनविषारी जातीचे साप मोठ्या प्रमाणावर आढळतात असे सर्पमित्र लाटे यांनी सांगितले


 
Top