उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्याचे रोजगार हमी योजना (रोहयो)आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे हे येत्या शनिवारी दि.28 ऑगस्ट 2021 रोजी उस्मानाबाद जिल्हयाच्या दौ-यावर येत आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे:-

  दुपारी 2:00 वा त्यांचे बीड येथून शासकीय वाहनाने मांजरसुंभा-येडशीमार्गे उस्मानाबादकडे प्रयाण होईल.दुपारी 2:30 ते 4:00 वाजेदरम्यान भूम,कळंब आणि उस्मानाबाद तालुक्यातील कामांची पाहणी करतील.दुपारी 4:00 वाजता उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगा कार्यान्वयीत यंत्रणेची जिल्हा व तालुका स्तरीय अधिकाऱ्यासमवेत आढावा बैठकीस उपस्थित राहतील.सायंकाळी 6:00 वा.उस्मानाबाद येथून ढोकीमार्गे वाहनाने लातूरकडे प्रयाण करतील.


 
Top