उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर , अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती आवळे  यांच्या  प्रत्यक्ष उपस्थित आणि त्यांच्या  मार्गदर्शनानुसार तसेच त्यांच्याआदेशानुसार  भूम तालुक्यामधील चार अनधिकृत स्टोन क्रशरवर कारवाई करत  ते सील करण्यात आले.  याबाबत  पंचनामा करण्यात आला असून  पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची कारवाईही सुरू आहे. 

या कारवाईत उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, तहसीलदार श्रीमती शृंगारे , नायब तहसीलदार  सावंत , श्री राठोड, श्री पाटील तसेच मंडळ अधिकारी श्री स्वामी, श्री पाटील, श्री हाके, तलाठी श्री थोरात, श्री केदार, श्री पाटील तसेच पोलीस ठाणे भूम येथील पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. प्रत्यक्ष ठिकाणी ६०० ब्रास हून अधिक बारीक खडी ,  कच विनापरवाना साठवल्याचे आढळून आला आहे . 

तसेच यापूर्वी मोठ्या प्रमाणावर टेकडी फोडून उत्खनन केल्याचे दिसून आले. त्याची इ टी (ets  मोजणी करून त्याबाबत कारवाई केली जात आहे. या कारवाईत पोलिस विभागाचेही सहकार्य मिळाले आहे .


 
Top