गोविंद पाटील  / प्रतिनिधी-

वेगवेगळ्या विषयांना वाचा फोडण्याचे काम करण्याबरोबरच जबरदस्त मनोरंजन चित्रपटाच्या माध्यमातून केले जाते. उस्मानाबाद शहरातील अभिनेते पवन वैद्य यांनी मुख्य भुमिका साकारलेला भोंगा मराठी चित्रपट दि. २९ ऑगस्ट रोजी झी-टॉकीजवर सर्वत्र झळकणार आहे. वैद्य यांनी यापुर्वी  फॉरेनची पाटलीन, धुडगूस, येडा, आटापीटा, रंगीबेरंगी व बेभानसारखे प्रक्षेकांना खिळवून सोडणारे चित्रपटाची निर्मिती केली आहे. उस्मानाबादच्या सुपूत्राने भूमिका साकारलेला चित्रपट पाहण्याची जिल्हावाशियांना प्रचंड उत्सुकता लागलेली आहे. कारण वैद्य गेल्या २५ वर्षांपासून चित्रपट क्षेत्रात काम करीत असून त्यांनी अनेक यशस्वी चित्रपट दिले असून सामाजिक भान असणारे देखील चित्रपट निर्माण केलेले आहेत. त्यांच्या चित्रपटाला देशासह विदेशातील विविध नामांकित पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 


कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर अनेक चित्रपट प्रदर्शीत होऊ शकले नाहीत, मात्र कोरोनाची लाट ओसरत चालली असून दिड वर्षांच्या कालावधीमध्ये कोंडून ठेवलेल्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी झी-टाकीजवर दि. २९ ऑगस्ट रोजी भोंगा हा चित्रपट झळकणार आहे. या चित्रपटात मनोरंजनाबरोबरच मानवी जीवनाला पर्यायाने स्वास्थ्य व्यवस्थित रहावे, यासाठी राज्य, केंद्र सरकार बरोबरच देश-विदेशातील सर्वच सरकारे प्रदुषण रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भोंगा या चित्रपटाच्या माध्यमातून पर्यावरणातील होणारे प्रदुषण किती घातक आहे ? हे दाखवून देण्याबरोबरच स्वच्छ पर्यावरण ठेवण्यासाठी कशा पध्दतीने नागरिकांनी काळजी व दक्षता घ्यावी ? याचे चित्रपटाच्या माध्यमातून करमणूकी बरोबरच रास्त संदेश देण्याचे काम केले आहे. 


या चित्रपटास मराठी सिने-सृष्टीतील आघाडीचे गायक म्हणून लौकीक असलेले आदर्श शिंदे व ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायन केले असून विजय गटलेवार यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटात कलाकार म्हणून कपिल गुडसूरकर, श्रीपात जोशी, दीप्ती धोत्रे, रमेश भोळे, अरूण गीते, सुधाकर बिराजदार आदींसह इतर कलाकारांनी यशस्वी भूमिका निभावल्या आहेत. 

गाव पुढाऱ्यांच्या भूमिकेत वैद्य 


कुठल्याही चित्रपटाचे किंवा नाटकाचे कथानक हे मुख्यताहा ग्रामीण भागावर आधारीत असते या चित्रपटात देखील एका खेडेगावात पर्यावरण पुरक वातावरण असताना तेथील समाज मनावर होणारे चांगले परिणाम चित्रीत केले आहे. तर ध्वनी,वायु प्रदुषणानंतर त्या गावातील नागरिकांच्या पर्यायाने गावकाऱ्यांच्या स्वास्थ्यांवर होणारे परिणाम, कौटूंबिक कलाहामुळे होणारे दुरगामी परिणाम रोखण्यासाठी गाव पुढारी म्हणुन उस्मानाबादनगरीचे सुपूत्र पवन वैद्य यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. विशेष म्हणजे वैद्य यांचा शब्द सर्व गावकरी प्रमाणमानित असल्यामुळे गावातील जनजीवन पुन्हा सुरळीत झाल्याचे यामधुन चित्रीत करण्यात आले आहे. हा चित्रपट २९ ऑगस्ट रोजी झी-टॉकीज तर दि. २४ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शीत होणार आहे, अशी माहिती अभिनेते पवन वैद्य यांनी दिली. 


 
Top