उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय हॉकी संघाने टोकीयो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीचा 4-3 असा पराभव करीत तब्बल 41 वर्षांनी पदकाची कमाई केली आहे. भारताने टोकियोत रचलेल्या या इतिहासाबद्दल उस्मानाबाद येथे हॉकी असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी दि, 6 ऑगस्ट रोजी तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथे जल्लोष करण्यात आला.

भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल 41 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल युनिट ऑफ हॉकी असोसिएशन उस्मानाबादच्या वतीने भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन करून जल्लोष करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या. हा कार्यक्रम उस्मानाबाद शहरातील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात आला. यावेळी हॉकी संघटनेचे अध्यक्ष इम्रान मोमीन, सचिव सय्यद फिरोज, उपाध्यक्ष दिपक जाधव, शाहजर शेख , योगेश थोरबोले, तोसीफ सौदागर आणि संघटनेचे हॉकीचे मार्गदर्शक फिरोज काझी, फुटबॉल संघटनेचे सचिव जावेद शेख, यांच्यासह सर्व हॉकी खेळाडू उपस्थित होते.

 
Top