उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्य सरकारकडून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी घातलेल्या निर्बंधामुळे रिक्षा व्यावसायिकांना मदत व्हावी म्हणून ऑटोरिक्षा परवानाधारकास १५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी दिली. 

ऑटोरिक्षा परवानाधारकांनी ऑफलाईन पध्दतीने कार्यालयाकडे ३० ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, परवानाधारकाचे लायसन्स, वाहनाचा परवाना, आधारकार्ड , अर्जदार नावाचा १ रद्द केलेला धनादेश किंवा पासबुकची झेरॉक्स प्रत आदी अर्जासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे द्यावा, या सानुग्रह अनुदानाचे जास्तीत जास्त परवानाधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गजानन नेरपगार यांनी केला आहे. 

 
Top