परंडा / प्रतिनिधी :-

परंडा तालुक्यातील शेळगाव येथे महात्मा फुले कृषी विदयापीठ संलग्नीत रत्नाई कृषी महाविदयालय अकलुज आयोजित ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कुमारी गिता हरीदास मोहळकर हिने शेतीवर आधारीत लघुउदयोग व व्यवसाय याबद्द़ल महिलांना मार्गदर्शन केले.यामध्ये तिने दुधाच्या पदार्थामध्ये पनीर, बासुंदी कसे बनवावे याचे प्रशिक्षण दिले. तसेच मोसंबीपासून जाम बनवन्याचे प्रशिक्षण दिले. गावात मोसंबीचे उत्पादन जास्त प्रमानावर घेतले जाते. त्यावर आधारीत कोणते व्यवसाय करता येतील याची माहिती दिली. महिलांनी शेतीबरोबरच शेतीवर आधारीत व्यवसाय करण्यास प्रोत्साहीत करणे हा कार्यक्रमाचा उद्द़ेश होता.

महिलांनी फक्त शेतीवर अवलंबून न राहता कायम आपल्या घरातील सदस्यांना रोजगार मिळेल असे शेतीपूरक व्यवसाय करावेत. संघटितपणे आणि प्रामाणीकपणे व्यवसाय केल्यास परिवारास निश्चीतच आर्थिक मदत प्राप्त होते. आपण करत असलेल्या व्यवसायाचे नियोजन परिपूर्ण केल्यास व्यवसायात हमखास यश मिळेल,असे तिने सांगितले. 

तसेच त्याकरिता तिला अकलुज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटिल , रत्नाई कृषी महाविदयालयाचे समनन्वयक डॉ.डी. पी.कोरटकर, प्राचार्य आर.जी.नलवडे, प्राध्यापक एस. एम. एकतपुरे, प्रा.एस.आर.आडत, प्रा.एन. बी. गाढवे, प्रा. डी. एस. मेटकरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गावच्या सरपंच सुलोचना शेवाळे, निर्मला दुधे, छाया शेंडकर व इतर महिला उपस्थित होत्या.


 
Top