उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील जिल्हा उद्योग केंद्रातर्फे 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारासाठी विविध योजनांची अंमलबजावणी  करण्यात येत आहे.  संबंधितांनी योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

  योजनांची माहिती अशी:

  मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम:- सेवा उद्योगासाठी दहा लाखापर्यंत. उत्पादन उद्योगासाठी पन्नास लाखापर्यंत.वयोमर्यादा अनुसुचित जाती,अनुसुचित जमाती,माजी सैनिक,अंपग,महिला यांना 18 ते 50 पर्यंत.सर्वसाधारण लाभार्थ्यांचे वय 18 ते 45 पर्यंत असावे.स्वगुंतवणूक  प्रकल्पाच्या पाच ते दहा टक्के असावी.अनुदान मर्यादा  अनुसुचित जाती,अनुसुचित जमाती,माजी सैनिक,अंपग, महिला यांना शहरी भागासाठी 25 टक्के आणि ग्रामीण भागासाठी 35 टक्के राहिल. सर्व साधारण लाभार्थींना शहरी भागात 15 टक्के आणि ग्रामीण भागात 25 टक्के देय राहिल.

   या योजनेसाठी लागणारे कागद पत्रे :- फोटो, आधार, पॅन कार्ड, जन्म तारखीचा पुरावा, लोकसंख्या प्रमाण पत्र (ग्रामपंचात 20 हजार च्या आत असेल तर) प्रकल्प अहवाल, जातीचे प्रमाण पत्र , हमी पत्र या योजना ही ऑनलॉईन असून maha-cmegp.gov.in या पोर्टलवर अर्ज करावा.

   पंतप्रधान रोजगार निर्मीती कार्यक्रम :अ) सेवा उद्योगासाठी :- दहा लाखापर्यंत.(10 लाख) उत्पादन उद्योगासाठी  पंचवीस लाख( 25 लाख रुपयां) पर्यंत. वयोमर्यादा 18 पूर्ण.स्वगुंतवणुक :- प्रकल्पाच्या 5 ते 10 टक्के. अनुदान मर्यादा अनुसुचित जाती,अनुसुचित जमाती,माजी सैनिक/अंपग/ओबीसी/अल्पसंख्यांक, महिला यांना शहरी भागासाठी 25 टक्के व ग्रामीण भागासाठी 35 टक्के राहिल तसेच सर्व साधारण लाभार्थी यांना शहरी भागात 15 टक्के व ग्रामीण भागात 25 टक्के देय राहिल.

  या योजनेसाठी लागणारे कागद पत्रे :- फोटो, आधार, पॅन कार्ड, जन्म तारखीचा पुरावा, लोकसंख्या प्रमाण पत्र (ग्रामपंचात 20 हजार च्या आत असेल तर) प्रकल्प अहवाल, जातीचे प्रमाण पत्र, हमी पत्र या योजना ही ऑनलॉईन असून pmegp kviconline.gov.in या पोर्टलवर अर्ज करावे.

   बीज भांडवल योजना-या योजने अंतर्गत शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुट पालन, किरणा दुकान स्टेशनरी, कापड दुकान आदी व्यवसायाठी अर्ज करता येतो.

  वयोमर्यादा 18 ते 50 पर्यंत आहे. स्वगुंतवणुक प्रकल्पाच्या पाच ते दहा टक्के. शिक्षण :- सातवी उत्तीर्ण. प्रकल्प मर्यादा 25 लाखा पर्यंत.   जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बीज भांडवल रक्कम 15 ते 20 टक्के पर्यंत सहा टक्के व्याज दराणे  पावने चार लाख (3.75) लाख मर्यादेत मिळू शकते. योजनांचा जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री पी. डी. हणबर यांनी केले आहे.

 
Top