उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सनियंत्रण व आढावा समिती, जिल्हास्तरीय आहार समिती, बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कृती दल, जिल्हा अभिसरण समिती, बाल कल्याण समिती, बाल संरक्षण समिती इत्यादी आणि इतर समितीच्या बैठका जिल्हाधिकारी सभागृहात घेण्यात आल्या. यावेळी  सर्व संबंधित विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत विषय निहाय आणि प्रकल्पनिहाय आढावा घेण्यात आला.

 जिल्ह्यात 01 सप्टेबर 2021 पासून राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यात महिला व बाल विकास विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभाग, अन्न्‍ व औषध प्रशासन, महिला व आर्थिक विकास महामंडळ, यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दिल्या.  घेतलेल्या कार्यक्रमाच्या नोंदी पोषण अभियान या वेबसाईटवर नोंदविण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधितांना सूचना दिल्या. या बैठकीस जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जि.प. महिला व बाल कल्याण समिती च्या सभापती सौ. रत्नमाला टेकाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, शिक्षणाधिकारी अरविंद मोहिरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी चौगुले, जि.प.चे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि)  बी.एच.निपाणीकर, महिला आर्थिक विकास महामंडळ श्रीमती कुलकर्णी तसेच जिल्हयातील  आठ बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.


 
Top