तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील आलियाबाद येथे अारोग्य स्वराज्य प्रकल्प अंतर्गत हॅलो मेडिकलच्या वतीने कोरोना रूग्णांना जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते चेकचे वाटप करण्यात आले.ज्या व्यक्तिंना कोरोना झाला होता व ज्यांची बिकट परिस्थिती आहे, अशा गरीब सात रुग्णांना प्रत्येकी पाच हजार प्रमाणे मदत देण्यात आली.

यावेळी  सरपंच ज्योतीका चव्हाण, पोलीस पाटील शिवाजी चव्हाण, ग्रामसेवक प्रशांत भोसले,नागेश सुरवसे, विनायक चव्हाण,नेमिनाथ राठोड,हरीदास चव्हाण, हरीचंद्र चव्हाण, ‌राजेद्र चव्हाण,,मोताबाई चव्हाण,, हॅलो मेडिकलच्या समुपदेशक नागिणी सुरवसे,फिल्ड सुपरवायझर अनुराधा जाधव, प्रेरिका रिना चव्हाण, रेशमा चव्हाण उपस्थित होते.

 
Top