तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थकुंड मंकावती हडप प्रकरणी  देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांना अटक करण्यात आली असुन त्यांना  गुरुवार दि . १९ रोजी तुळजापूर  तालुका   न्यायालयासमोर उभे केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्यांना  २३ आँगस्ट २०२१ पर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

 तिर्थकुंड हडप प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर देवानंद रोचकरी गायब झाले होते त्यांना मुंबई मंञालया समोर  तुळजापूर पोलिस पथकाने बुधवार दि. १८ रोजी सकाळी ११ वा. ताब्यात घेतले तेथुन राञी ११ वाजता तुळजापूर पोलिस स्टेशनला आणले तर  त्यांचे बंधु बाळासाहेब रोचकरी हे गुरुवारी १९ रोजी रोजी पहाटे ३ वाजता  स्वताहुन तुळजापूर पोलिस स्टेशनला हजर झाले.

यांना गुरुवारी १२ वाजत  न्यायालयासमोर उभे केले. यावेळी देवानंद रोचकरी व बाळासाहेब रोचकरीच्या वतीने अँड विजय भगवानराव शिंदे यांनी रोचकरी यांच्या वतीने युक्तीवाद केला  तर सरकार पक्षातर्फ  ऐपीपी अँड कोरे यांनी  युक्तिवाद केला .

यावेळी पोलिसांनी नियमानुसार ७ दिवसाची पोलिस कोठडी मागीतली असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी देवानंद रोचकरी व त्यांचे बंधु बाळासाहेब यांना २३आँगस्ट २०२१ पर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.


 
Top